एसटी बसमध्ये ‘पॅनिक बटण’, CCTV आणि सुरक्षा वाढणार; महिलांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

Maharashtra ST Bus | राज्यातील एसटी(Maharashtra Transport) बससेवा अधिक सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी मोठ्या सुधारणा करण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांत महिलांच्या (Women Safety Maharashtra) सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे आता प्रत्येक नव्या एसटी बसमध्ये ‘पॅनिक बटण’ बसवण्यात येणार आहे, तर बसस्थानकांवर (ST Bus Station CCTV) सीसीटीव्ही कॅमेरे आणि अधिक सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.

परिवहन विभागाच्या योजनेनुसार राज्यातील सर्व महत्त्वाची एसटी बस स्थानके ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (ST Bus Stand Redevelopment PPP) या तत्त्वावर विकसित केली जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत स्थानकांव्यतिरिक्त आगारे व कार्यालयेदेखील संबंधित विकासकांकडून बांधून घेण्यात येणार आहेत.

सध्या एसटी महामंडळाकडे (MSRTC Land Redevelopment) एकूण 1,360 हेक्टर जमीन असून, तिचे शहरी, निमशहरी आणि ग्रामीण विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील 66 जागांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

ताफ्यात 2,640 नवीन बस

एसटी महामंडळाच्या (MSRTC New Buses 2025) ताफ्यातील जुन्या बसना आता निरोप देण्यात येत असून त्यांच्या जागी नवीन बस दाखल केल्या जात आहेत. 2025 मध्ये एकूण 2,640 लालपरी बस ताफ्यात येणार आहेत. यापैकी 800 पेक्षा अधिक बसआधीच प्रवासी सेवेत दाखल झाल्या आहेत.

याशिवाय, 3,000 नव्या बससाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून त्यात ग्रामीण व डोंगराळ भागांसाठी बस (Rural Bus Services Maharashtra) तर शहरी भागातील प्रवाशांसाठी 200 वातानुकूलित शयनयान बस्स (AC Sleeper ST Bus) घेतल्या जाणार आहेत. यामुळे गाव ते शहर आणि आदिवासी भागापर्यंत एसटीची सेवा पोहोचणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार

तसेच, एसटीच्या कर्मचाऱ्यांना (MSRTC Staff Salary Update) वेळेवर पगार मिळावा यासाठी आता दर महिन्याच्या 7 तारखेला पगार थेट बँक खात्यात जमा केला जाणार आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून निर्माण झालेल्या पगार अडचणींवर तोडगा निघणार आहे.