Vi New Recharge Plan | टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea – Vi) आपला नवीन प्रीपेड प्लॅन ग्राहकांसाठी लाँच केला आहे. कंपनीच्या या प्लॅनची किंम 340 रुपये आहे. 340 रुपये किंमतीचा हा प्लॅन कंपनीने कोणत्याही गाजावाजाविना आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केला असून तो आता सर्व सर्कलमध्ये उपलब्ध आहे.
Vi च्या 340 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये मिळणारे फायदे
Vi च्या वेबसाइटनुसार, हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. त्यामध्ये दररोज 1GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा समावेश आहे. याशिवाय ग्राहकांना एकदा वापरण्यासाठी 1GB अतिरिक्त डेटा (Extra Data) ही सुविधा दिली जात आहे.
मात्र, किंमत आणि फायदे पाहता, या प्लॅनचा दररोजचा खर्च जवळपास 12 रुपये इतका पडतो, त्यामुळे काही ग्राहकांना हा पर्याय महाग वाटू शकतो. विशेष म्हणजे, मुंबई सर्कलमध्ये या प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा (Unlimited 5G Data) सुद्धा दिला जात आहे.
ग्राहकांना या प्लॅनमध्ये रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान अमर्यादित डेटा, वीकेंड डेटा रोलओव्हर (Weekend Data Rollover) आणि डेटा डिलाइट (Data Delight) यांसारख्या सुविधा देखील मिळेल.
Airtel चा 299 रुपयांचा प्लॅन
दुसरीकडे, Airtel कडे 299 रुपयांचा Truly Unlimited Plan उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये देखील 28 दिवसांची वैधता, दररोज 1GB डेटा, 100 SMS आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळते. डेटा संपल्यानंतर स्पीड 64Kbps वर कमी होते.
एअरटेलचा हा प्लॅन ‘एअरटेल थँक्स’ (Airtel Thanks) अंतर्गत येतो, ज्यामध्ये Unlimited 5G डेटा, Free Hellotunes, आणि Wynk Music चे मोफत सब्स्क्रिप्शन (Free Wynk Music Subscription) मिळते. शिवाय, Airtel Thanks App वरून रिचार्ज केल्यास ग्राहकांना 2GB अतिरिक्त डेटाही मोफत मिळतो.