स्वस्त आणि मस्त! Motorola चा नवीन स्टायलिश स्मार्टफोन लाँच, फीचर्स पाहून व्हाल थक्क

Motorola Edge 60 Stylus

नवीन डिझाईन आणि स्टायलस फीचर्ससह Motorola ने भारतात (Smartphone Launch India) आपला नवा स्मार्टफोन Motorola Edge 60 Stylus सादर केला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली असून तो Qualcomm Snapdragon 7s Gen 2 चिपसेटवर आधारित आहे.

या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यात देण्यात आलेला बिल्ट-इन स्टायलस, जो ‘Sketch-to-Image’ सारख्या AI-आधारित क्रिएटिव्ह टूल्ससाठी उपयुक्त आहे.

Motorola Edge 60 Stylus: किंमत

नवीन Motorola Edge 60 Stylus एकाच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला असून त्यात 8GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आले आहे. फोनची किंमत 22,999 रुपये आहे. हा फोन urf the Web आणि Gibraltar Sea या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

विक्री कधीपासून सुरू?

Motorola Edge 60 Stylus ची विक्री 23 एप्रिलपासून सुरू होणार आहे. ग्राहकांना हा फोन Motorola India ची अधिकृत वेबसाइट, Flipkart आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध होईल.

ऑफर्स:

  • Axis Bank आणि IDFC Bank च्या क्रेडिट कार्डवर 1,000 रुपयांची बँक सवलत
  • ट्रेड-इन डीलमध्ये एक्सचेंज व्हॅल्यू व्यतिरिक्त ₹1,000 चा बोनस

Motorola Edge 60 Stylus ची वैशिष्ट्ये

  • डिस्प्ले 6.7-इंचाचा pOLED डिस्प्ले, रिझोल्यूशन 1.5K, पीक ब्राइटनेस 3000 nits
  • प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 7s Gen 2
  • रॅम व स्टोरेज: 8GB RAM + 256GB इंटरनल स्टोरेज (1TB पर्यंत एक्स्पांड)
  • बॅटरी: 5000mAh, 68W वायर्ड चार्जिंग, 15W वायरलेस चार्जिंग
  • सुरक्षा: IP68 रेटिंग, Corning Gorilla Glass 7i, MIL-STD-810H
  • कॅमेरा सेटअप : 50MP चा Sony LYT 700C प्रायमरी सेन्सर असून त्यासोबत 13MP चा अल्ट्रा-वाइड (Macro Vision) सेन्सर, सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

AI-आधारित स्मार्ट फीचर्स

या फोनमध्ये स्टायलस वापरून ‘Sketch-to-Image’ सारखी AI फीचर दिले आहे, ज्यात युजर हाताने काढलेली चित्रे प्रत्यक्षात डिजिटल इमेजमध्ये रूपांतरित करू शकतो. तसेच, ‘Handwriting Calculator’ फीचर हाताने लिहिलेल्या गणिती सूत्रांचे लगेच विश्लेषण करून उत्तर देतो. याशिवाय, इतर एआय फीचर्स देखील यात मिळतील.