Anaya Bangar | भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांचा मुलगा आर्यन बांगरने गेल्यावर्षी लिंग बदल शस्त्रक्रिया केली होती. आता आर्यन अनाया बांगर (Anaya Bangar) म्हणून ओळखली जाते. लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर आता अनायाने तिच्या या प्रवासाबद्दल माहिती दिली आहे.
लल्लनटॉप या युट्यूब चॅनेलशी बोलताना अनायाने अनेक गोष्टींबद्दल भाष्य केले. अनेक क्रिकेटपटूंनी आपल्याला नग्न छायाचित्रे पाठवून त्रास दिला, असा धक्कादायक खुलासा देखील तिने आहे. लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर (Hormone Replacement Therapy – HRT) स्वतःच्या प्रवासावर उघडपणे बोलणाऱ्या अनायाने सांगितले की, केवळ सामाजिक स्तरावरच नव्हे, तर क्रिकेट जगतातही तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
अनायाने सांगितले की, सत्य समोर आल्यानंतरचा तिचा प्रवास किती कठीण होता. तिने क्रीडा क्षेत्रातील लोकांकडून मिळालेला पाठिंबा आणि झालेल्या त्रासाच्या घटना उघड केल्या.
“मला पाठिंबाही मिळाला आणि काही प्रमाणात त्रासही झाला… काही क्रिकेटपटूंनी मला त्यांचे नग्न फोटो पाठवले, असा खुलासा तिने केला.
याच मुलाखतीत अनायाने आर्यन म्हणून खेळताना तिची खरी लिंग ओळख लपवण्याच्या भावनिक त्रासाबद्दलही सांगितले. तिने आठवण करून दिली की गुंतागुंत टाळण्यासाठी तिला तिची ओळख लपवावी लागली. तिने यशस्वी जैस्वाल, सरफराज खान आणि त्याचा भाऊ मुशीर खान यांसारख्या अनेक सध्याच्या भारतीय स्टार्ससोबत मैदान शेअर केले होते.
“मी मुशीर खान, सरफराज खान, यशस्वी जैस्वाल यांसारख्या आताच्या काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंसोबत खेळले. मला माझ्याबद्दल गुप्तता ठेवावी लागली कारण वडील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत. क्रिकेट जग असुरक्षितता आणि विषारी पुरुषत्वाने भरलेले आहे,” असेही अनाया म्हणाली.
काही क्रिकेटपटू मला नग्न फोटो पाठवत आहेत. एका क्रिकेटपटून मला गाडीत बसण्यास सांगून माझ्याशी संबंध प्रस्थापित करायचे असल्याचे सांगितले. काही क्रिकेटपटू तर मला सर्वांसमोर शिव्या देत असून माझे नग्न फोटो मागत आहेत. खेळाच्या मैदानात आज भलेही समानतेच्या गोष्टी केल्या जात असतील, मात्र मैदानाबाहेर भेदभाव आणि गैरवर्तन तसेच आहे, असेही तिने पुढे सांगितले.