Oppo K13 5G भारतात लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये, 7000mAh बॅटरीसह मिळतील शानदार फीचर्स

Oppo K13 5G

Oppo K13 5G | ओप्पोने भारतात आपल्या के सिरीजमधील नवीन स्मार्टफोन Oppo K13 5G ला 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला आहे. हा स्वस्त स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 प्रोसेसर आणि 7000mAh बॅटरीसह येतो.

कमी किंमतीत शानदार फीचर्ससह येणाऱ्या Oppo K13 5G स्मार्टफोनविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Oppo K13 5G: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

ओप्पो के 13 5जी मध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा 120Hz चा रिफ्रेश रेट, FHD+ रिझोल्यूशन आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेस आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 प्रोसेसर आणि एड्रेनो 810 जीपीयू आहे. फोनमध्ये 8GB LPDDR4X RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजचा पर्याय मिळतो. उत्तम गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी, ओप्पो के 13 5जी मध्ये 5700mm² व्हेपर चेंबर आणि 6000mm² ग्राफाइट शीट दिलेली आहे, जी फोन गरम होण्यापासून वाचवते.

ओप्पोच्या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा सोनी IMX480 सेन्सरसह मिळतो. युजर्स एआय क्लॅरिटी एन्हांसर, एआय अनब्लर, एआय रिफ्लेक्शन रिमूव्हर आणि एआय इरेजर यांसारख्या शक्तिशाली कॅमेरा एआय फीचर्सचा लाभ घेऊ शकतात.

या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची मोठी 7000mAh ची बॅटरी, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओप्पो के 13 5जी अँड्रॉइड 15 आधारित ColorOS 15 वर काम करतो. ओप्पो 2 वर्षांचे ओएस अपडेट्स आणि 3 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Oppo K13 5G: किंमत आणि उपलब्धता

ओप्पो के 13 5जी दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे: आइसी पर्पल आणि प्रिझम ब्लॅक. स्मार्टफोनच्या 8GB+128GB स्टोरेज वेरिएंटची सुरुवाती किंमत ₹17999 आहे, तर 8GB+256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ₹19999 आहे. भारतात ओप्पो के 13 चा सेल एप्रिल 25 पासून सुरू होईल आणि तो फ्लिपकार्ट, ओप्पो इंडिया ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.