नवी दिल्ली – ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
या तीन दिवसांच्या दुखवट्यापैकी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस सलग दुखवटा पाळला जाणार असून पोप यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील त्या दिवशी तिसऱ्या दिवसाचा दुखवटा पाळला जाणार आहे. दुखवट्याच्या कालावधीत कोणताही मनोरंजनपर कार्यक्रम साजरा करण्यास मज्जाव असेल.
