Bike Taxi Policy : महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, इलेक्ट्रिक बाईक टॅक्सींना अधिकृत परवानगी

Maharashtra Bike Taxi Policy

Maharashtra Bike Taxi Policy | शहरी भागातील वाहतूक अधिक सुलभ, स्वच्छ आणि स्मार्ट बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने बाईक टॅक्सी सेवेसाठी अधिकृत धोरण (Bike Taxi Maharashtra) जाहीर केलं. या धोरणानुसार, ज्या शहरांची लोकसंख्या 1 लाख किंवा त्याहून अधिक आहे, त्या सर्व ठिकाणी बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. विशेष बाब म्हणजे सर्व बाईक टॅक्सी या पूर्णपणे इलेक्ट्रिक (Electric Vehicles) असतील, जे पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी एक सकारात्मक दिशा ठरेल.

धोरणातील महत्त्वाचे नियम आणि सुरक्षा उपाय

या धोरणानुसार, प्रत्येक बाईक टॅक्सीवर केवळ 1 प्रवासी प्रवास करू शकेल. सर्व चालकांचं वय 20 वर्षांपेक्षा जास्त असणं बंधनकारक आहे. 12 वर्षांखालील मुलांना या सेवेचा लाभ घेता येणार नाही. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, बाईक टॅक्सीमध्ये चालकाच्या मागे संरक्षक कवच असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय, सरकारचा उद्देश महिला चालकांची संख्या 50% पर्यंत नेण्याचा आहे, जरी यासाठी कोणतीही वेळ मर्यादा दिलेली नाही.

परवाने आणि वैधता

सुरुवातीला 50 अ‍ॅग्रीगेटर्सना परवाने दिले जातील आणि प्रत्येक परवाना 5 वर्षांसाठी वैध असेल. हे परवाने हस्तांतरणीय असणार नाहीत.

प्रवाशांसाठी विमा आणि तंत्रज्ञानसहाय्य

प्रत्येक बाईक टॅक्सीत GPS ट्रॅकिंग (GPS tracking), आपत्कालीन संपर्क सुविधा आणि पावसाळ्यातील संरक्षणासाठी कव्हर आवश्यक असेल. याशिवाय, अपघात किंवा जीवितहानी झाल्यास चालक आणि प्रवाशांसाठी विमा संरक्षण अनिवार्य आहे.

प्रवास मर्यादा आणि कनेक्टिव्हिटीसाठी मोठा टप्पा

प्रत्येक बाईक टॅक्सी राईडची मर्यादा 15 kms ठेवण्यात आली आहे, जे सेवा दर्जा टिकवण्यासाठी उपयुक्त ठरेल. या धोरणामुळे शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि शहरी भागांतील नागरिकांना जलद, स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होईल.