Anant Ambani : अनंत अंबानी यांच्याकडे आता महत्त्वाची जबाबदारी, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्णवेळ संचालकपदी नेमणूक

Anant Ambani

Anant Ambani | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (Reliance Industries Ltd) अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे सर्वात लहान पुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांची कंपनीचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आता अनंत अंबानींकडे महत्त्वाची जबाबदारी असेल.

ब्राउन विद्यापीठाचे पदवीधर असलेले अनंत अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्त झालेले सर्वात तरुण गैर-कार्यकारी संचालक आहेत.

कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, मनुष्यबळ, नामांकन आणि मानधन समितीच्या शिफारशीनुसार मंडळाने अनंत अंबानी यांच्या नियुक्तीला 1 मे 2025 पासून सुरू होणाऱ्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी दिली आहे, जी भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन असेल.

यापूर्वी रिलायन्सच्या संचालक मंडळावर गैर-कार्यकारी संचालक म्हणून काम पाहणारे अनंत अंबानी आता भारतातील सर्वात मूल्यवान कंपनीत अधिक सक्रिय कार्यकारी भूमिका स्वीकारणार आहेत. अनंत अंबानी हे जिओ प्लॅटफॉर्म्स (मार्च 2020 पासून), रिलायन्स रिटेल व्हेंचर्स (मे 2022 पासून) आणि रिलायन्स न्यू एनर्जी व रिलायन्स न्यू सोलर एनर्जी (जून 2021 पासून) यांसारख्या रिलायन्स समूहातील अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावरही कार्यरत आहेत. सप्टेंबर 2022 पासून ते रिलायन्स फाउंडेशनचे बोर्ड सदस्य देखील आहेत.

अनंत यांचे मोठे बंधू आकाश आणि बहीण ईशा अंबानी हे देखील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर गैर-कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. आकाश हे समूहाच्या दूरसंचार आणि डिजिटल सेवा विभागाचे रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आहेत, तर ईशा या समूहाच्या रिटेल विभागाच्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक आहेत.

Share:

More Posts