प्रीमियम फीचर्स, बजेटमध्ये! CMF Phone 2 Pro भारतात लाँच, किंमत खूपच कमी

CMF Phone 2 Pro launched in India

CMF Phone 2 Pro Launched in India | नथिंगच्या (Nothing) CMF या उप-ब्रँडने भारतात आपला नवीन स्मार्टफोन CMF Phone 2 Pro लाँच केला आहे. हा फोन उत्तम डिझाइन आणि शानदार फीचर्ससह येतो.

CMF Phone 2 Pro दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. फोनच्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे.

CMF Phone 2 Pro ची भारतात पुढील आठवड्यात फ्लिपकार्टवर विक्री सुरू होईल. खरेदीदारांना लाँचच्या पहिल्या दिवशी 1000 रुपयांची ची विशेष सूट देखील मिळेल. फोनला चार वेगवेगळ्या रंगात खरेदी करता येईल. व्हेरियंटच्या टेक्सचरमध्ये थोडा फरक आहे, ज्यात ग्लास-सारखे फिनिश आणि सँडस्टोन बॅक पॅनेलचे पर्याय मिळतात.

CMF Phone 2 Pro: डिझाइन आणि डिस्प्ले

CMF Phone 2 Pro ची जाडी 7.8 मिमी आणि वजन 185 ग्रॅम आहे, ज्यामुळे हा CMF चा आतापर्यंतचा सर्वात पातळ स्मार्टफोन ठरतो. या डिव्हाइसमध्ये CMF Phone 1 प्रमाणेच ॲल्युमिनियम कॅमेरा सराउंड आणि स्टेनलेस स्टीलचे स्क्रू आहेत. यात 6.77-इंचाचा फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz चा ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आणि 3000 nits ची पीक ब्राइटनेस देतो. यात ड्युअल सिम सपोर्ट आणि डिस्प्लेच्या खाली फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

CMF Phone 2 Pro: परफॉर्मन्स

फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रो 5G प्रोसेसर आहे, जो 4 nm प्रक्रियेवर आधारित आहे. फोन 8GB रॅम (RAM बूस्टर तंत्रज्ञानाद्वारे 16GB पर्यंत) सपोर्ट करतो आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देतो, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवता येते.

CMF Phone 2 Pro: कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टीम आहे, ज्यामध्ये 50MP चा मुख्य सेन्सर आहेटेलीफोटो लेन्स 2x ऑप्टिकल आणि 20x पर्यंत डिजिटल झूम ऑफर करतो. यात 8MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील आहे. डिव्हाइस 30 fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करते, ज्यात हालचाल करताना होणारे शेक कमी करण्यासाठी AI-आधारित स्टॅबिलायझेशन आहे. सेल्फीसाठी समोर 16MP चा पंच-होल कॅमेरा मिळतो.

CMF Phone 2 Pro: बॅटरी, सॉफ्टवेअर

या हँडसेटमध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग आणि 5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. CMF चा दावा आहे की ही बॅटरी दोन दिवस टिकते. CMF Phone 2 Pro अँड्रॉइड 15 वर आधारित नथिंग OS 3.2 सह येतो. CMF ने डिव्हाइससाठी तीन वर्षांच्या अँड्रॉइड वर्जन अपडेट्स आणि सहा वर्षांच्या सुरक्षा पॅचेसचे आश्वासन दिले आहे.

Share:

More Posts