Shikhar Dhawan Girlfriend: क्लीन बोल्ड! घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात पडला शिखर धवन, ‘माय लव्ह’ म्हणत केला गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर

Shikhar Dhawan Confirms Relationship With Sophie Shine

Shikhar Dhawan Confirms Relationship With Sophie Shine | भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan) पुन्हा प्रेमात पडला आहे. शिखरने सोशल मीडिया पोस्टद्वारे सोफी शाइनसोबत (Sophie Shine) असलेल्या आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे.

या दोघांच्या नात्याबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. धवन आणि शाइन बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी ते एकत्र दिसल्यामुळे याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते.

शिखर धवनचा 2019 मध्ये आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट झाल्यानंतर आता तो सोफी शाइनसोबत नात्यात आहे.

शिखर आणि सोफी शाइनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत अधिकृतपणे याची कबुली दिली आहे. शाइनने या पोस्टला “माझं प्रेम ❤️” असं कॅप्शन दिलं आहे. सोफी शाइन अलीकडेच भारतात अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट देताना दिसली होती. तिने पारंपरिक भारतीय वेशभूषेतील फोटोही पोस्ट केले होते आणि धवनसोबत रील बनवतानाही ती दिसली होती. याशिवाय, धवन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (ICC Champions Trophy) ब्रँड अँम्बेसेडर असताना सोफी त्याच्यासोबत दिसली होती.

सोफी शाइन कोण आहे?

सोफी शाइनचा जन्म आयर्लंडमध्ये झाला असून ती एक प्रॉडक्ट कन्सल्टंट आहे. तिने लिमेरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. तिने आयर्लंडमधील कॅसलरॉय कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती अबू धाबी येथील नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये सेकंड व्हाइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहे.

शाइन आणि धवनची पहिली भेट कधी झाली हे निश्चितपणे सांगता येत नसले तरी, धवनने 2024 मध्ये निवृत्तीची घोषणा केल्यानंतर दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. सोफी आयपीएल PL 2024 दरम्यानही धवनसोबत स्टेडियममध्ये दिसली होती, ज्यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली.

रिपोर्टनुसार, धवन आणि शाइन यांची काही वर्षांपूर्वी दुबईमध्ये भेट झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी वर्षभरापूर्वी एकत्र राहण्यास सुरुवात केल्याचेही सांगितले जाते.