बँकेत नोकरीची संधी! Union Bank of India मध्ये 500 पदांसाठी भरती सुरू, पाहा संपूर्ण माहिती

Union Bank of India SO Recruitment 2025

Union Bank of India SO Recruitment 2025 | तुम्ही जर बँकेची नोकरी शोधत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank of India Vacancy) स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officer ) पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

इच्छुक उमेदवारांना 500 पदांसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2025 आहे.

या भरती प्रक्रियेत सहाय्यक व्यवस्थापक (Union Bank of India SO Recruitment 2025) पदासाठी एकूण 500 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये क्रेडिट आणि आयटी विभागात प्रत्येकी 250 पदांचा समावेश आहे.

पात्रता आणि निवड प्रक्रिया

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर निकषांची माहिती युनियन बँकेच्या अधिकृत जाहिरातीमध्ये तपासावी. निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होईल – संगणक आधारित चाचणी (CBT) आणि मुलाखत. गरज पडल्यास ग्रुप डिस्क्शन किंवा अर्जांची छाननीही केली जाऊ शकते.

संगणक आधारित परीक्षेत क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्रजी भाषा आणि व्यावसायिक ज्ञान यावर आधारित प्रश्न असतील. इंग्रजी भाषेच्या परीक्षेशिवाय इतर प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये असतील.

अर्ज कसा करावा?

  • अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in ला भेट द्या.
  • ‘Careers’ विभागात ‘Recruitment for Specialist Officer 2025’ निवडा.
  • ‘Apply Online’ वर क्लिक करा आणि ईमेल व मोबाइल नंबरने नोंदणी करा.
  • अर्जात आवश्यक माहिती भरा, फोटो-साक्षरता अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरून अर्ज सादर करा.

अर्ज शुल्क

  • SC/ST/PwBD उमेदवारांसाठी शुल्क ₹177 (GST सह)
  • इतर सर्वांसाठी शुल्क ₹1180 (GST सह)
  • पेमेंटसाठी डेबिट/क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग, UPI, मोबाईल वॉलेटचा पर्याय उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • जाहिरात प्रसिद्ध – 30 एप्रिल 2025
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 मे 2025
  • शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 20 मे 2025