Ex Pakistan PM Imran Khan Fake Medical Report | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामधील संबंध ताणले गेले आहे. दोन्ही देशांमधील या तणावाच्या स्थितीमध्ये पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जेलमधून सोडण्याची मागणी समर्थकांकडून केली जात आहे. त्यातच आता इम्रान खान (Ex Pakistan PM Imran Khan) यांच्यावर तुरुंगात असताना लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक दावा केला जात आहे.
इम्रान खान यांच्यावर लैंगिक अत्याचा झाल्याचा आरोप करणारा एक अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रावळपिंडीतील पाक एमिरेट्स मिलिटरी हॉस्पिटल (PEMH) चा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या अहवालाचे सत्य काय?
हा अहवाल पाकिस्तानी अधिकारींनी खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.रिपोर्टनुसार, खान यांची वैद्यकीय तपासणी इस्लामाबादमधील पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (PIMS) डॉक्टरांनी केले होते, PEMH ने नाही. त्यामुळे हा अहवाल खोटा आहे.
2 मे 2025 रोजी ‘एक्स’ (ट्विटर) वरील एका युजरने कथित वैद्यकीय अहवाल शेअर केल्यानंतर या चर्चांना तोंड फुटले. अहवालावर 3 मे 2025 ची तारीख असल्याने यात विसंगती आढळली, ज्यामुळे हा अहवाल बनावट असल्याचा संशय बळावला.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इम्रान समर्थकांनी त्यांच्या सुटकेची मागणी करण्यााठी कॅम्पेन राबवले आहे. पाकिस्तान लष्कर आणि सरकारसमोर आणखी एक राजकीय आव्हान उभे राहिले आहे. अलीकडच्या दिवसांत, तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सुटका करण्यासाठी शहबाज शरीफ सरकारवर दबाव वाढत आहे.
खान एप्रिल 2022 मध्ये पाकिस्तानी लष्कराशी संबंध बिघडल्यानंतर ते सत्तेतून बाहेर पडले. इम्रान खान यांनी तुरुंगात टाकण्यापूर्वी लष्कराच्या विरोधात मोठे आंदोलन केले होते. त्यांच्या अटकेनंतर, त्यांच्या समर्थकांनी रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयासह अनेक लष्करी आस्थापनांवर हल्ला केला होता.