Operation Sindoor | ‘ऑपरेशन सिंदूर’ ची माहिती देणाऱ्या वीर महिला! जाणून घ्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशींबद्दल

Operation Sindoor

Operation Sindoor | पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील दहशतवादी तळांवरजोरदार हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या कारवाईस ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले. असून, ही कारवाई रात्री 1:00 ते 1:30 दरम्यान करण्यात आली.

विदेश मंत्रालय, भारतीय लष्कर आणि हवाई दलयांनी याबाबत संयुक्त पत्रकार परिषद घेत या कारवाईची माहिती दिली. विशेष बाब म्हणजे, या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांनी – कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sofia Qureshi) आणि विंग कमांडर व्योमिका सिंह (Wing Commander Vyomika Singh) – यांनी ऑपरेशनविषयी माहिती दिली. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांविषयी जाणून घेऊयात.

कर्नल सोफिया कुरेशी – सैन्यातील परंपरेचा वारसा

वडोदरायेथील रहिवासी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी या सिग्नल कोरमध्ये कार्यरत असून 1999 साली शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Short Service Commission) अंतर्गत त्या सैन्यात दाखल झाल्या. कारगिल युद्ध सुरू असताना त्यांनी देशसेवेचा मार्ग स्वीकारला होता. 2016 मध्ये त्यांनी बहुराष्ट्रीय क्षेत्र प्रशिक्षण सरावात भारतीय तुकडीचे नेतृत्व केले होते. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेमध्ये देखील काम केले आहे. सैन्य परंपरेचा वारसा त्यांच्या कुटुंबात असून त्यांच्या पतीदेखील मेकनाइज्ड इन्फंट्रीमध्ये (Mechanized Infantry) कार्यरत आहेत.

त्यांचे वडील ताज मोहम्मद कुरेशी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “माझ्या मुलीने देशासाठी मोठे कार्य केले. आम्हाला तिचा अभिमान आहे. पाकिस्तान नष्ट होण्याची गरज आहे.”

विंग कमांडर व्योमिका सिंह कोण आहेत?

विंग कमांडर व्योमिका सिंह या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर पायलटआहेत. 2004 मध्ये त्या हवाई दलात दाखल झाल्या आणि 2017 मध्ये त्यांना विंग कमांडर पद मिळाले. त्यांना चेतक आणि चित्ता (Chetak, Cheetah) सारखी लढाऊ हेलिकॉप्टर्स उडवण्याचा अनुभव आहे. त्यांच्या नावावर 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) अत्यंत कठीण बचाव मोहिमेचे नेतृत्व करण्याची कामगिरी नोंदली आहे.

व्योमिका सिंह यांचे पती देखील हवाई दलात पायलट आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “मी सहावीच्या वर्गात असताना माझ्या नावाचा अर्थ ‘व्योम’ म्हणजे ‘आकाश’ समजल्यावर मी ठरवलं – मला पायलटच व्हायचं आहे.” त्यांनी UPSC मार्फत हवाई दलात प्रवेश घेतला.