Operation Sindoor | पाकिस्तान जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाबमधील 36 शहरांजवळच्या भारतीय लष्करी आस्थापनांवर 300 ते 400 तुर्की बनावटीचे ड्रोन डागून मोठा हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
हे हल्ले श्रीनगरपासून जैसलमेर आणि पठाणकोटपर्यंत करण्यात आले. कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत यबाबत माहिती दिली.
पाकिस्तानी ड्रोन लडाखमधील सियाचीन ग्लेशियर बेस कॅम्प आणि गुजरातच्या कच्छ भागातही दिसले; ही दोन्ही ठिकाणे सुमारे 1,400 किमी अंतरावर आहेत, ज्यामुळे हल्ल्याची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होते. कर्नल कुरेशी यांनी सांगितले की, हवाई संरक्षण तोफांनी 50 ड्रोन पाडले. आणखी 20 ड्रोन रेडिओ फ्रिक्वेन्सी जाम करून निष्प्रभ करण्यात आले. बहुतेक ड्रोन निशस्त्र होते, ज्यामुळे पाकिस्तानने भारताच्या संरक्षेची चाचणी घेतली असावी, असे दिसते. मात्र, अनेक ड्रोनमध्ये कॅमेरे बसवलेले होते, ज्याद्वारे पाकिस्तानमधील ग्राउंड स्टेशन्सना फुटेज पाठवले गेले असावे.
रिपोर्टनुसार, पाकिस्तानने Asiguard SONGARड्रोनचा वापर केला, जे “कोणत्याही प्रकारच्या दिवसा/रात्रीच्या लष्करी आणि सुरक्षा कार्यात प्रभावीपणे” वापरले जाऊ शकतात आणि त्यांची मारक क्षमता 5 किमी आहे. कर्नल कुरेशी म्हणाल्या की, शेकडो ड्रोन डागणे – जे सर्व भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने रोखले किंवा निष्प्रभ केले, हे युद्धविराम कराराचे (ceasefire agreement) घोर उल्लंघन आहे.
त्या म्हणाल्या की, यात जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (Line of Control – LoC) सुरू असलेली शस्त्रास्त्रांची गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा यांचाही समावेश आहे, ज्यात एका सैनिकासह 16 भारतीय मारले गेले.
याला प्रत्युत्तर देताना, भारतीय लष्कराने पाकिस्तानचे ‘मोठे नुकसान’ (heavy damage) केले, असे कर्नल कुरेशी यांनी सांगितले. भारताने शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली आणि पाकिस्तानच्या हवाई संरक्षण नेटवर्कलानिकामी करून जोरदार प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानने मे च्या रात्री सर्वात पहिल्यांदा ड्रोन आणि क्षेपणास्त्रद्वारे हल्ला केला होता. हे ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर काही तासांनी घडले. पाकिस्तानने भारतीय लष्करी बेसना लक्ष्य करून क्षेपणास्त्रांचा मारा केला, पण भारताच्या एकात्मिक काउंटर-यूएव्ही प्रणाली (integrated counter-unmanned aerial system – C-UAS) सह हवाई संरक्षण प्रणालीने ते हाणून पाडले.