भारत-पाक शस्त्रसंधी: सोशल मीडियावर इंदिरा गांधींची चर्चा, नक्की कारण?

Indira Gandhi

India-Pakistan Ceasefire | भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. दोन्ही देशांनी सीमावर्ती भागात शस्त्रसंधी लागू करण्यास सहमती दर्शवली आहे. शस्त्रसंधीची घोषणा होताच सोशल मीडियावर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नावाची चर्चा होत आहे.

सोशल मीडियावर अनेकजण इंदिरा गांधींचा (Indira Gandhi) फोटो व भाषण शेअर करत आहेत. तसेच, 1971 च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धाची आठवण करून देत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दोन्ही देशातील शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केल्याचे सांगितले. त्यानंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री (Vikram Misri) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, भारत आणि पाकिस्तान एलओसी (LOC) आणि इतर सीमावर्ती भागात गोळीबार थांबवण्यास सहमत झाले आहेत आणि हा निर्णय तात्काळ लागू झाला आहे. या निर्णयामुळे सोशल मीडियावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचे नाव अचानक ट्रेंड करू लागले, ज्यामुळे हा मुद्दा अधिक चर्चेत आला.

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत (Supriya Shrinate) यांनी लिहिले, ‘इंदिरा गांधी होणे सोपे नाही’. अशा परिस्थितीत चार दिवसांत शस्त्रसंधी झाल्यामुळे सोशल मीडियावरही याची चर्चा होत आहे. काँग्रेस, काँग्रेस समर्थक आणि काही सोशल मीडिया युजर्स या प्रसंगी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत आहेत. 1971 च्या युद्धात इंदिरा गांधी यांनी अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता पाकिस्तानचे दोन तुकडे करत बांगलादेशच्या निर्मितीस मदत केली होती.

काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरून इंदिरा गांधी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन (Richard Nixon) यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

या फोटोसोबत काँग्रेसने लिहिले आहे, ‘इंदिरा गांधींनी निक्सन यांना सांगितले होते – आमचा कणा ताठ आहे. आमच्याकडे प्रत्येक अत्याचाराला तोंड देण्याची इच्छाशक्ती आणि संसाधने आहेत. तो काळ गेला जेव्हा कोणीतरी तीन-चार हजार मैल दूर बसून भारतीयांनी त्यांच्या इच्छेनुसार चालावे, असा आदेश देत असे.’ काँग्रेसने ट्विटमध्येलिहिले आहे, ‘ही होती हिंमत. हे होते भारतासाठी खंबीरपणे उभे राहणे आणि देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड न करणे.’

मात्र, काही लोकांचे मत आहे की 1971 आणि 2025 ची तुलना करणे योग्य नाही. 1971 मध्ये जेव्हा पाकिस्तानसोबतच्या युद्धानंतर बांगलादेश (Bangladesh) तयार झाला, तेव्हा सोव्हिएत युनियन होता, परंतु 1991 मध्ये त्याचे विघटन झाले आणि नंतर रशिया (Russia) तयार झाला. रशियाकडे सोव्हिएत युनियनची शक्ती उरली नाही आणि हा भारतासाठीही धक्का मानला गेला. एका बाजूला सोव्हिएत युनियनने भारताला साथ दिली होती, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान त्यावेळी अण्वस्त्र-सज्ज देश नव्हता.

Share:

More Posts