Visa Rules | भारतामधील अमेरिकन दूतावासाने (US Embassy) भारतीय नागरिकांसाठी एक कठोर इशारा जारी केला आहे. व्हिसाचे नियम (visa rules) मोडणाऱ्यांवर कायमस्वरूपी अमेरिकेत प्रवेशबंदी (visa ban) आणि देशातून हकालपट्टी (deportation) होऊ शकते, असा स्पष्ट अमेरिकेच्या दूतावासाने दिला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
अवैध स्थलांतर रोखण्याच्या उद्देशाने या महिन्यातील अमेरिकन दूतावासाने अशाप्रकारे तिसऱ्यांदा ट्विट करत इशारा दिला आहे.
व्हिसा मुदतीपलीकडे राहिल्यास कठोर कारवाई
दूतावासाने म्हटले आहे की, “तुम्ही जर व्हिसाच्या अधिकृत मुदतीनंतर अमेरिकेत वास्तव्यास राहिलात, तर तुम्हाला केवळ देशातून हाकलले जाईल असे नाही, तर भविष्यात अमेरिकेत जाण्यासही बंदी घातली जाऊ शकते.” हे नियम सर्व प्रकारचे व्हिसाधारक जसे की वर्क व्हिसा (work visa), स्टुडंट व्हिसा (student visa), किंवा टूरिस्ट व्हिसा (tourist visa) यासाठी लागू होतात.
दूतावासाने हे स्पष्ट केले आहे की व्हिसावर छापलेली समाप्ती तारीख ही अमेरिकेत वास्तव्यासाठी परवानगी असलेली अंतिम तारीख नसते. वास्तविक, प्रत्येक आगमनावेळी पोर्ट-ऑफ-एंट्री वर कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन अधिकारी ठरवतात की तुम्हाला किती दिवस परवानगी आहे.
दूतावासाच्या आणखी एका पोस्टमध्ये नमूद केले आहे की, “व्हिसा फसवणूक करणाऱ्यांवर कायमस्वरूपी बंदी लागू केली जाईल. अशा फसवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींवर आणि देशांवर देखील व्हिसा निर्बंध लावले जातील.” अमेरिकन सरकार सध्या फसवणूक आणि अवैध स्थलांतर रोखण्यासाठी आंतर-एजन्सी मोहिम राबवत आहे.
दूतावासाने स्पष्टपणे सांगितले की अगदी थोडा कालावधी जरी अधिक राहिले तरी त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी आणि मूळ व्हिसा नियम याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.