‘या’ बिग बजेट चित्रपटात दीपिका पदुकोणची जागा घेणार तृप्ती डिमरी, दाक्षिणात्य स्टारसोबत झळकणार!

Tripti Dimri to Star Opposite Prabhas in Spirit

Tripti Dimri to Star Opposite Prabhas in Spirit | अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) पुन्हा एकदा खास कारणांमुळे चर्चेत आली आहे. तृप्ती आता लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत (Prabhas) स्क्रीन शेअर करणार आहे. तृप्ती डिमरी आणि प्रभास हे निर्माता-दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी ‘स्पिरिट’ (Spirit Movie) या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत.

‘ॲनिमल’ (Animal) या चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) चर्चेत आली होती. आता तिची संदीप रेड्डी वांगा यांच्या आणखी एका चित्रपटात एन्ट्री झाली आहे.

प्रभासच्या चाहत्यांना ज्या बातमीची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती, ती आता पूर्ण झाली आहे. ‘स्पिरिट’ चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीसाठी तृप्ती डिमरीच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. यापूर्वी या चित्रपटात प्रभाससोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) दिसणार असल्याची चर्चा होती, मात्र आता तृप्ती डिमरीची वर्णी लागली आहे.

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याची अधिकृत घोषणा केली आहे. तृप्ती डिमरीनेही तिच्या इंस्टाग्राम हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. पोस्ट शेअर करत तृप्तीने लिहिले, “मी अजूनही या स्वप्नात रमून गेली आहे, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल संदीप रेड्डी वांगा सर तुमचे आभार. ‘स्पिरिट’मध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहे.” तृप्तीच्या या पोस्टवर प्रभासने कमेंट करत तिचे चित्रपटात स्वागत केले आहे.

दरम्यान, यापूर्वी ‘स्पिरिट’ चित्रपटात दीपिका पदुकोणच्या नावाची चर्चा होती. मात्र, रिपोर्टनुसार, दीपिकाने जास्त मानधन मागितल्यामुळे निर्मात्यांशी तिची बोलणी झाली नाही. कमी मानधन मिळाल्याने दीपिकाने हा चित्रपट सोडला असल्याचे सांगितले जाते. दीपिकाने 20 कोटी मानधनासोबतच चित्रपटाच्या नफ्यातही वाटा मागितला होता. यासोबतच तिने तमिळमधील संवाद बोलण्यासही नकार दिला होता. आता दीपिका नव्हे तर तृप्ती आणि प्रभासची जोडी पहिल्यांदा बॉक्स ऑफिसवर दिसणार आहे.

तृप्ती डिमरी यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे. मात्र, तिला खरी ओळख रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘ॲनिमल’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात तृप्तीचा रोल छोटा होता, पण तिच्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना तिने वेड लावले. ‘ॲनिमल’नंतर तृप्ती राजकुमार रावसोबतही (Rajkummar Rao) दिसली आहे. आता प्रभाससोबत तिची जोडी चाहत्यांना किती आवडते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.