iQOO Neo 10 | iQOO ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन iQOO Neo 10 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन यापूर्वी भारतात आलेल्या iQOO Neo 10R चा पुढील अपग्रेड आहे. दोन्ही फोनमध्ये डिझाइनची समानता असली तरी, iQOO Neo 10 हा अधिक शक्तिशाली आणि शानदार फीचर्स दिले आहेत.
यात नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8S जेन 4 चिपसेट, 16 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी स्टोरेजदेण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळतोiQOO Neo 10 विषयी अधिक माहिती घेऊया.
iQOO Neo 10 किंमत:
- 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज: ₹31,999
- 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज: ₹33,999
- 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज: ₹35,999
- 16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज: ₹40,999
कंपनी लाँच ऑफर अंतर्गत ठराविक कार्ड्सवर 2,000 रुपयांची सूट देत आहे, ज्यामुळे iQOO Neo 10 च्या चारही व्हेरियंट्सची प्रभावी किंमत अनुक्रमे 29,999 रुपये, 31,999 रुपये, 33,999 रुपये आणि 38,999 रुपये होते.
iQOO Neo 10 ची विक्री Amazon आणि iQOO च्या अधिकृत वेबसाइटवर 3 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल.
iQOO Neo 10 स्पेसिफिकेशन्स:
iQOO Neo 10 मध्ये 6.78 इंचचा 144Hz AMOLED डिस्प्ले आहे, ज्याची पीक ब्राईटनेस 5500 निट्स आणि 4320Hz PWM डिमिंग आहे. यात पाणी आणि धूळीपासून सुरक्षेसाठी IP65 रेटिंग (IP65 protection) देखील आहे, ज्यामुळे हलका पाऊस आणि पाण्याच्या स्प्लॅशपासून संरक्षण मिळते.
कनेक्टिव्हिटीसाठी फोन 16 5G बँड्स, IR ब्लास्टर, NFC, ब्लूटूथ 5.4 आणि वाय-फाय 7 सपोर्ट करतो.
iQOO Neo 10 मध्ये स्नॅपड्रॅगन 8S जेन 4 चिपसेटसोबत एड्रेनो 825 जीपीयू आहे. यात LPDDR5X रॅम आणि UFS 4.1 स्टोरेजचा वापर करण्यात आला आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, यात OIS सह 50MP Sony IMX882 चा मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा (32MP front camera) देखील देण्यात आला आहे.
Neo 10 अँड्रॉइड 15 आधारित फनटच ओएस 15 वर चालतो. iQOO ने तीन वर्षांचे ओएस अपडेट्स (OS updates) आणि चार वर्षांचे सुरक्षा पॅचेस देण्याचे आश्वासन दिले आहे. फोनमध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 120W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वायरलेस चार्जिंगची सुविधा यात उपलब्ध नाही.