Flight turbulence due to Delhi dust storm | मागील काही दिवसांपासून दिल्लीतील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस, धुळीचे वादळ याचा फटका विमानसेवेला देकील बसत आहे. दिल्लीला जाणारी इंडिगोची (IndiGo) एक फ्लाईट जोरदार धुळीच्या वादळामुळे लँडिंग शकली नाही. ही फ्लाईट रायपूरहून दिल्लीला येत होती.
फ्लाईट दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) लँड करत असताना अचानक हवामान बिघडले. वाऱ्याचा वेग सुमारे 80 किलोमीटर प्रति तास इतका वाढला, ज्यामुळे वैमानिकाला शेवटच्या क्षणी लँडिंग टाळावी लागली.
काही वेळ विमान हवेतच होते, नंतर हवामान थोडे सामान्य झाल्यावर ते सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर लँड झाले. वैमानिकाने प्रवाशांना सांगितले की जोरदार वाऱ्यामुळे त्याने लँडिंग थांबवली होती आणि सुरक्षित उंचीवर जाऊन हवामान ठीक होण्याची वाट पाहिली.
वैमानिकाने प्रवाशांना माहिती दिली की हवामान खराब झाले आहे. अशा परिस्थितीत सुरक्षेला प्राधान्य देत वैमानिकाने पुन्हा उड्डाण करण्याचा निर्णय घेतला.
#WATCH | An IndiGo flight number 6E 6313 from Raipur to Delhi experienced turbulence due to a duststorm, prompting the pilot to climb up again when the aircraft was about to touch down at Delhi airport. The aircraft landed safely at Delhi airport after making many circuits in the… pic.twitter.com/TtDUwIH79b
— ANI (@ANI) June 1, 2025
विमानातील एका प्रवाशाने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये विमान हवेत असताना झालेल्या वादळाचा क्षण कैद झाला आहे. प्रवाशांना देखील धक्के बसत असल्याचे दिसत आहे.
दिल्लीच्या हवामानात अचानक बदल:
यापूर्वी दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi-NCR) जोरदार वाऱ्यासह धुळीचे वादळ आणि रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला.
जोरदार पावसामुळे वातावरणातील तापमान घटले, ज्यामुळे दिल्लीच्या विविध भागांमध्ये तापमानात 14 अंश सेल्सिअसपर्यंत मोठी घट झाली आणि रहिवाशांना उष्णतेपासून थोडा पण सुखद दिलासा मिळाला. हवामानातील हा अचानक बदल भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या पूर्वीच्या अंदाजानुसार होता, ज्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसांत दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांमध्ये हलका पाऊस आणि 50-70 किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वाऱ्यासह वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.