Singhastha Kumbh Mela 2026 | महान धार्मिक परंपरांचे दर्शन घडवणारा सिंहस्थ कुंभमेळा 2026 (Singhastha Kumbh Mela 2026) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) आणि नाशिक (Nashik) येथे भव्य स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने या पवित्र उत्सवाच्या तयारीला वेग दिला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत झालेल्या नियोजन बैठकीत अंतिम वेळापत्रक निश्चित करण्यात आले.
18 महिन्यांचा कुंभमेळा: ऐतिहासिक आयोजन
पहिल्यांदाच 18 महिन्यांचा कुंभमेळा होणार असून, यात 3 प्रमुख ‘अमृत स्नान’ आणि 42 पर्वणी स्नान पार पडणार आहेत.
मुख्य कार्यक्रम आणि महत्त्वाच्या तारखा
- ध्वजारोहण (Dhvajarohan) समारंभ: 31 ऑक्टोबर 2026
- समाप्ती ध्वज समारंभ: 24 जुलै 2028
- नगर प्रदक्षिणा (पवित्र मिरवणूक): 29 जुलै 2027
- साधुग्राम ध्वजारोहण: 24 जुलै 2027
‘शाही स्नान’ चे नामकरण बदलून ‘अमृत स्नान’ – धार्मिक नेत्यांनी सांस्कृतिक मूल्ये जपण्यासाठी ‘शाही स्नान’ ऐवजी ‘अमृत स्नान’ नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या ‘अमृत स्नान’ तारखा:
नाशिक:
- 2 ऑगस्ट 2027
- 31 ऑगस्ट 2027
- 11 सप्टेंबर 2027
त्र्यंबकेश्वर:
- 2 ऑगस्ट 2027
- 31 ऑगस्ट 2027
- 12 सप्टेंबर 2027
गोदावरी नदीच्या स्वच्छतेवर विशेष भर
बैठकीत गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या उपायांवर चर्चा झाली. कुंभमेळा प्राधिकरणाची (Kumbh Mela Authority) स्थापना करून स्वच्छता आणि व्यवस्थापन सुलभ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभमेळा सुरक्षित, स्वच्छ आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध ठेवण्यासाठी गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा प्रोटोकॉल आणि पायाभूत सुविधा सुधारण्याचे आश्वासन दिले आहे.