Home / देश-विदेश / भिन्नलिंगी जोडप्याचा पालक म्हणून उल्लेख करा! हायकोर्टाचे आदेश

भिन्नलिंगी जोडप्याचा पालक म्हणून उल्लेख करा! हायकोर्टाचे आदेश

तिरुअनंतपुरम – केरळमधील पहिल्या तृतीयपंथीय मातापित्यांच्या मुलाच्या प्रमाणपत्रावर माता व पिता असे वेगवेगळे उल्लेख करण्याऐवजी केवळ पालक असा उल्लेख करण्याचे...

By: Team Navakal

तिरुअनंतपुरम केरळमधील पहिल्या तृतीयपंथीय मातापित्यांच्या मुलाच्या प्रमाणपत्रावर माता व पिता असे वेगवेगळे उल्लेख करण्याऐवजी केवळ पालक असा उल्लेख करण्याचे आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिले आहेत. या तृतीयपंथीय पालकांनी या संदर्भात केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती झियाद रेहमान यांनी हे आदेश दिले आहेत.

जाहद हा जन्माने स्त्री असलेल्या व्यक्तीने नंतर पुरुष अशी ओळख मिळवली होती. तसेच झिया पावेल हा जन्माने पुरुष व नंतर महिला म्हणून ओळख मिळवली होती. या भिन्नलिंगी व्यक्तींनी विवाह केला होता. ते केरळमधील पहिले भिन्नलिंगी जोडपे म्हणूनही गाजले होते. यातील जाहादने फेब्रुवारी २०२३ मध्ये एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर कोझिकोडेच्या महानगरपालिकेने त्यांच्या मुलाच्या जन्मप्रमाणपत्रावर या दोघांचा उल्लेख मातापिता असा केला. त्यावर या दोघांनी आपल्या मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावर केवळ पालक असा उल्लेख करण्याची विनंती केली. पालिकेने ती विनंती फेटाळल्यानंतर त्यांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली. केरळ उच्च न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत जन्मप्रमाणपत्रावर त्यांचा उल्लेख केवळ पालक असा करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या