Home / महाराष्ट्र / दक्षिण मुंबईत १० ठिकाणी आता मोफत पार्किंग सुविधा

दक्षिण मुंबईत १० ठिकाणी आता मोफत पार्किंग सुविधा

मुंबई – दक्षिण मुंबईतील पालिकेच्या ‘ए’ विभागात कुलाबा येथील १० ठिकाणी नवीन निविदा निघेपर्यंत पार्किंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय पालिका...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – दक्षिण मुंबईतील पालिकेच्या ‘ए’ विभागात कुलाबा येथील १० ठिकाणी नवीन निविदा निघेपर्यंत पार्किंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेने १ जूनपासून १० ठिकाणी पे-अँड-पार्क सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेत स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे. भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केलेल्या मागणीनंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट आणि कफ परेड परिसरातील १० प्रमुख ठिकाणी आता मोफत पार्किंग उपलब्ध करून दिले आहे. ऑपरेटर जास्त शुल्क आकारत आहेत किंवा योग्य परवानगीशिवाय पैसे वसूल करीत आहेत, अशा तक्रारींनंतर पालिका प्रशासनाने दक्षिण मुंबईतील प्रमुख भागांत मोफत पार्किंगची ही तात्पुरती योजना सुरू केली आहे. पालिकेच्या ‘ए’ विभागातील हॉर्निमन सर्कल, जमनालाल बजाज मार्ग, दोराबजी टाटा रोड, इरॉस सिनेमासमोरील ट्रॅफिक आयलंड, वालचंद हिराचंद मार्ग, रामजीभाई कामानी मार्ग (पश्चिम बाजू), करिंबोय मार्ग, बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग, मुद्रणा शेट्टी लेन, चिंचोळी लेन, व्ही. एन. रोड, होमजी स्ट्रीट आणि नागीनदास मास्टर लेन या १० ठिकाणी ही मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. याआधी पालिकेने नियुक्त केलेले कंत्राटदार योग्य परवानगीशिवाय जादा शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेने हा मोफत पार्किंगचा निर्णय घेतला आहे. या तक्रारींच्या माध्यमातून माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनीही ६ मे रोजी तशा मागणीचे पत्र पालिकेला दिले होते.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या