Home / शहर / रायगडावर आज शिवराज्यभिषेक सोहळा रंगणार ! जड वाहने बंद

रायगडावर आज शिवराज्यभिषेक सोहळा रंगणार ! जड वाहने बंद

रायगड – रायगड किल्ल्यावर उद्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

रायगड – रायगड किल्ल्यावर उद्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी विविध कार्यक्रम होणार असल्याने त्यासाठीची जय्यत तयारी रायगड जिल्हा प्रशासनाने केली आहे. याशिवाय याठिकाणी कोणतीही वाहतूक कोंडी किंवा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अवजड वाहनांना बंदी केली आहे. त्यांचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
रायगड जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे म्हणाले की,रायगड जिल्ह्यात आज सायंकाळी ४ वाजल्यापासून ते ६ जून रोजी रात्री १० वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी आहे. यामध्ये
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाकणफाटा, नागोठणे ते कशेडी, माणगाव–निजामपूर मार्गावर माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला तर महाड–नातेखिंड मार्गावर पाचाड ते रायगड किल्ला मार्गांचा समावेश आहे.याशिवाय ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पश्चिमेकडील गांधीनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले आहे. त्याचे उद्या छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यानिमित्ताने या ठिकाणी भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचेही आयोजन केले आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या