मनसेचे एकमेव माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार

मुंबई – मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असताना मुंबईत मनसेला धक्का बसला आहे.मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. ते सोमवारी ९ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबत कलिना विभागातील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश होणार आहे .
संजय तुर्डे हे २०१७ मधील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कालिना विभागातून निवडून आले होते. त्या निवडणुकीत मनसेचे एकूण सात उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर दिलीप लांडे, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, दत्ता नरवणकर, डॉ. अर्चना भालेराव आणि हर्षला मारे या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, संजय तुर्डे यांनी मनसेतच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक ठरले होते.