Home / देश-विदेश / सेमी कंडक्टरसाठी सेझ प्रस्तावांना सरकारची मंजुरी

सेमी कंडक्टरसाठी सेझ प्रस्तावांना सरकारची मंजुरी

नवी दिल्ली– केंद्र सरकारने सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक सुट्ट्या भागांच्या उत्पादनासाठी ‘सेझ’ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्र नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत....

By: Team Navakal

नवी दिल्ली– केंद्र सरकारने सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक सुट्ट्या भागांच्या उत्पादनासाठी ‘सेझ’ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्र नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. यासंदर्भातील दोन कंपन्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.

नियम बदलल्याने सेमीकंडक्टर उत्पादन वाढीला बळ मिळेल. वाणिज्य विभागाने ३ जून रोजी या सुधारणा अधिसूचित केल्या आहेत.त्यानंतर, सेमिकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक घटकांच्या निर्मितीसाठी अनुक्रमे सेमिकंडक्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमएसटीआय) आणि हुबळी ड्युरेबल गुड्स क्लस्टर प्रायव्हेट लिमिटेड (एक्स ग्रुप) कडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना सेमिकंडक्टर मान्यता मंडळाने मंजुरी दिली आहे. गुजरातमधील साणंद येथे ३७.६४ हेक्टर क्षेत्रफळावर १३,००० कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीसह मायक्रोन तर कर्नाटकातील धारवाड येथे १०० कोटी रुपयांच्या अंदाजे गुंतवणुकीसह इलेक्ट्रॉनिक भागांचे उत्पादन करण्यासाठी ११.५५ हेक्टर क्षेत्रफळावर एक्कस कंपनी कारखाना करण्यात येईल .

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या