‘… म्हणून विराट कोहली माझ्याशी अनेक महिने बोलत नव्हता’,  एबी डिव्हिलियर्सने स्वतः सांगितले कारण

Virat Kohli - AB de Villiers

Virat Kohli – AB de Villiers | विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांची मैत्री क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुने (RCB) आयपीएल 2025 चा किताब जिंकल्यानंतर हे दोन दिग्गज पुन्हा एकत्र आले. मात्र, एबी डिव्हिलियर्सने नुकताच खुलासा केला की, विराटने काही महिन्यांपूर्वी त्यांच्याशी बोलणे बंद केले होते. यामागचे कारण देखील त्याने सांगितले.

गेल्या वर्षी, डिव्हिलियर्सने विराट आणि अनुष्का हे दुसरे बाळ एक्स्पेक्ट करत होते. यासाठी विराटने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. मात्र, डिव्हिलियर्सने युट्यूब चॅनेलवर बोलताना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर विराट अनेक महिने एबी डिव्हिलियर्स सांगितले.

“आम्ही दोघे एकाच परिस्थितीत होतो हे मला माहीत आहे, कारण आम्ही याबद्दल बोललो होतो. गेल्या सहा महिन्यांपासून तो माझ्या संपर्कात आहे. देवाचे आभार! कारण, त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माबद्दल मी खुलासा केल्यावर मला काही काळ त्रासात राहावे लागले होते. त्यामुळे, जेव्हा त्याने माझ्याशी पुन्हा बोलणे सुरू केले तेव्हा मला खूप दिलासा मिळाला,” असे डिव्हिलियर्स एका मुलाखतीत बोलताना सांगितले.

विराटच्या निवृत्तीवर डिव्हिलियर्सचे मत

डिव्हिलियर्सने विराटच्या अलीकडील कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीवरही भाष्य केले. “विराट कठीण परिस्थितीतून जात होता. त्याने माझ्याशी निवृत्तीच्या निर्णयाबद्दल चर्चा केली होती. क्रिकेटमधील राजकारण, ताण आणि खेळाडू म्हणून सतत मैदानावर राहण्याची जबाबदारी यामुळे तो दबावात होता. मी त्याला माझे अनुभव सांगितले आणि त्याला पाठिंबा दिला. तो अजूनही क्रिकेट खेळतोय, आणि त्याच्या निर्णयाला मी 100 टक्के पाठिंबा देतो,” असे डिव्हिलियर्स म्हणाले.