युट्यूबर ज्योती विरोधातील एफआयआर बेकायदेशीर! वकिलाचा दावा

FIR Against YouTuber Jyoti is Illegal, Claims Lawyer

FIR Against YouTuber Jyoti is Illegal, Claims Lawyer

हिसार – युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या YouTuber Jyoti विरोधातील एफआयआर बेकायदेशीर FIR Controversy असल्याचा दावा तिचे वकील कुमार मुकेश यांनी केला.त्यांनी माहिती दिली की,हिसार पोलिसांनी १६ मे रोजी हेरगिरीच्या Arrested on charges of espionage आरोपाखाली ज्योतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. १७ मे रोजी तिला हिसार येथून अटक केली. त्यानंतर, तिची ५ आणि ४ दिवसांच्या रिमांडवर दोनदा चौकशी केली. ३ मोबाइल फोन आणि १ लॅपटॉप पोलिसांच्या ताब्यात आहे. परंतु त्यांनी अद्याप न्यायालयात कोणताही पुरावा दिलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी तयार केलेले एफआयआर बेकायदेशीर आहे. याशिवाय ज्योतीच्या अटकेनंतर जसबीरसिंगला ३ जूनला पंजाबमधून अटक केली होती. त्याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा आरोपही केला होता. त्याचे वकील माधव शुक्ला यांनी सांगितले की, पोलिसांनी जसबीरचे आयएसआयशी संबंध असल्याबाबत कोणतेही ठोस पुरावे न्यायालयात दिलेले नाहीत. तपासाशी संबंधित अधिकारी सांगत आहेत की, सर्व पुरावे आरोपपत्रात सादर केले जातील.