भाजपाचा शिंदेंना पुन्हा दणका!एमएसआरडीसीचे पंख छाटले

BJP hits Shinde again, clips MSRDC powers

BJP hits Shinde again, clips MSRDC powers

मुंबई – भाजपाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde यांना आणखी एक दणका दिला आहे.सरकारने शिंदेंकडे असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) MSRDC प्रकल्प खर्चावरील नियंत्रण आपल्या हाती घेतले आहे.त्यामुळे यापुढे प्रकल्प राबवताना एमएसआरडीसीला पैशासाठी सरकारकडे हात पसरावे लागणार आहेत.
राज्य सरकारने एमएसआरडीसीसह महाराष्ट्र पायाभूत सविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचेही वित्तीय नियंत्रण आपल्याकडे घेतले आहे.यातील एमएसआयडीसी हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात शिंदेंच्याच पुढाकाराने स्थापन झाले आहे.एमएसआरडीसी आणि एमएसआयडीसी या दोन्ही महामंडळांकडे असलेले प्रकल्पांवर खर्च करण्याचे अधिकार काढून घेण्यात आल्याने शिंदेंना हा फार मोठा धक्का मानले जात आहे.BJP hits Shinde again, clips MSRDC powers
ही दोन महामंडळे आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यामार्फत रस्ते बांधणी आणि अन्य पायाभूत सुविधानिर्मितीची सुमारे दोन लाख कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत. त्यातील त्यातील काही प्रकल्प सरकार नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाइनव्हिटकडे सोपवणार आहे. थोडक्यात एमएसआरडीसी आणि एमएसआयडीकडील महत्वाचे प्रकल्प महाइनव्हिटकडे जाणार आहेत.