Model dies in Taiwan due to sleep-inducing milk injection
तैवान – झोपेवरील उपचार म्हणून वापरले जाणारे मिल्क इंजेक्शनच्या milk injection अतिमात्रेमुळे तैवानमधील taiwan model मॉडेल काई यूशिनचा cai yuxin मृत्यू झाला. तिला तैपेई येथील फेरी क्लिनिकमध्ये हे इंजेक्शन दिल्याची माहिती आहे.या प्रकरणी तैवानमधील प्रसिद्ध कॉस्मेटिक डॉक्टर वु शाओहु यांच्याविरुद्ध स्थानिक प्रशासनाने चौकशी सुरू करून त्यांच्यावर निष्काळजीपणा आणि वैद्यकीय सेवा कायद्याच्या उल्लंघनाचा ठपका ठेवला आहे. social media influencer
काई यूशिन तैवानमधील प्रसिद्ध मॉडेल होती. समाज माध्यमावर तिचे लाखो फॉलोअर होते. बहुतांश वेळा तिची तुलना प्रसिद्ध अभिनेत्री लिन ची-लिंग हिच्याशी केली जाते असे. मागील काही दिवस कोई यूशिन ही निद्रानाशामुळे त्रस्त होती. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी तिने एका मित्राच्या सल्ल्यानुसार २५ मे रोजी फेरी क्लिनिकमध्ये मिल्क इंजेक्शन घेण्याचा निर्णय घेतला.
वू शाओहू तैवानमध्ये गॉडफादर ऑफ लायपोसक्शन Godfather of Liposuction म्हणून ओळख जाते.त्यांनी काई यूशिनवर निद्रानाशावर उपचार केले. या उपचारांतर्गत तिला मिल्क इंजेक्शन दिले. ज्यामध्ये प्रॉपोफोल या अल्पकालीन अॅनेस्थेसियाचा समावेश होता. हे औषध सामान्यतः वेदना निवारण आणि भूल देण्यासाठी वापरले जाते. उपचारानंतर वु शाओहु यांनी उपचारकक्षातून बाहेर पडून तिची जबाबदारी एक पुरुष सहाय्यकावर सोपवली. त्या सहाय्यकाकडे वैध नर्सिंग परवाना नव्हता. यादरम्यान युशिनला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. तिचा श्वासोच्छवास थांबला. घाबरलेल्या सहाय्यकाने वु शाओहु यांना संपर्क केला. तेव्हा त्यांनी व्हिडीओ कॉलवरून सीपीआरचे CPR मार्गदर्शन दिले. परंतु तोपर्यंत काई युशिनचा श्वास थांबला होता. हृदय बंद झाले होते. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे ती १८ दिवस कोमामध्ये होती. परंतु तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर तिच्या कुटुंबीयांनी जीवनरक्षक उपकरणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला.या घटनेनंतर तैवानच्या आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाने तपास सुरू केला. त्यांनी वु शाओहु यांच्यावर निष्काळजीपणामुळे गंभीर इजा होणे आणि मेडिकल केअर कायद्याचे उल्लंघ केल्याचा आरोप ठेवले आहेत. संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.