वॉशिंग्टन – संगणक क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंटेल (Intel)जगभरातील आपल्या दहा हजार कर्मचाऱ्यांना (10,000 employees) कामावरून कमी करणार आहे. कंपनीने एकूण मनुष्यबळाच्या १५ ते २० टक्के कर्मचारी कपात करण्याचे ठरवले आहे. ही या कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्मचारी कपात असणार आहे.
कर्मचाऱ्यांसाठी गंभीर बाब म्हणजे मागील कपातीच्या वेळी देण्यात आला होता तसा स्वेच्छानिवृत्तीचा पर्यायदेखील कंपनी यावेळी देणार नाही. त्याऐवजी कंपनी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाचे मुल्यमापन करून कर्मचाऱ्यांना काढणार आहे.
इंटेलचे उत्पादन विभागाचे उपाध्यक्ष नागा चंद्रशेखरन (Intel Manufacturing Vice President Naga Chandrasekaran) यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे याची सूचना दिली आहे.कर्मचारी कपात करणे अप्रिय वाटत असले तरी कंपनीच्या सध्याची आर्थिक स्थिती आणि बाजारातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी असे निर्णय आवश्यक आहे,असे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.
