Shiv Sena ministers upset over delay in appointment of private secretaries
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसCM Fadanvis यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सत्तेत येऊन सहा महिने झाले आहेत. तरीही महायुतीतील मित्र पक्षात असलेले नाराजी नाट्य संपलेले दिसत नाही.त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप मंत्रिमंडळातील mahayuti ministry dipuite मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या नियुक्तीला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले.pending appointment of private secretaries
शिवसेनेच्या shiv sena minister मंत्र्यांच्या खासगी सचिव नियुक्तीची फाइल मुख्यमंत्री कार्यालयात पडून आहे.मुख्यमंत्र्यांनी अद्याप या फायलींना मंजुरी दिलेली नाही. काही कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या विशेष पसंतीचा private secretaries खासगी सचिव असावा अशी मागणी केली होती.याला मुख्यमंत्र्यांनी विरोध करत नव्या खासगी सचिवांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यानुसार शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड,उदय सामंत,शंभूराजे देसाई, भरत गोगावले, गुलाबराव पाटील या कॅबिनेट मंत्र्यांकडील खासगी सचिव नियुक्तीसाठी काही नावे मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली आहेत.मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने खासगी सचिवांच्या नावाला अद्यापही हिरवा कंदील दाखवलेला नाही,यामुळे या कॅबिनेट मंत्र्यांना खासगी सचिव अद्यापही नियुक्त करता आलेले नाहीत.ही नियुक्ती करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही अटी घातल्या असून काही निकषही लावले आहेत.