दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या दोघांना पहलगाममध्ये अटक

Two arrested in Pahalgam for sheltering terrorists

Two arrested in Pahalgam for helping terrorists

पहलगाम – पहलगाम Pahalgam terrorist attack हल्ल्यासंबंधित दहशतवाद्यांना आसरा दिल्याच्या आरोपात एनआयएने NIA दोन संशयितांना अटक केली. यामध्ये परवेज अहमद जोठार (बटकोटे) आणि बशीर अहमद जोठार (हिल पार्क) या Two arrest दोघांचा समावेश आहे. यासंदर्भात एनआयएने माहिती दिली की, दोन्ही संशयित पहलगामचे रहिवासी आहेत. त्यांनी बंदी घातलेल्या पाकिस्तानच्या lashkar -e- toyaba लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन सशस्त्र दहशतवाद्यांना निवारा, अन्न आणि इतर आवश्यक मदत पुरवली होती. त्यांना अटक करून त्यांच्याविरोधात दहशतवादी कृत्याला मदत केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.त्यांच्या चौकशीदरम्यान आरोपी परवेज आणि बशीर यांनी हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. ते पाकिस्तानचे नागरिक असल्याचेही त्यांनी कबूल केले. त्या दोघांनी हल्ल्यापूर्वी हिल पार्कमधील एका हंगामी झोपडीत (ढोक) दहशतवाद्यांना लपवून ठेवले होते.
पहलगामध्ये २२ एप्रिलला बैसरण व्हॅली येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात २६ जण ठार झाले होते आणि १६ जण जखमी झाले होते.