Voting Concludes for Malegaon Cooperative Sugar Factory in Baramati
पुणे – बारामतीत आज माळेगाव सहकारी कारखान्यासाठी (sugar factory) मतदान पार पडले. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला. या कारखान्याचे एकूण १९ हजार ६५१ सदस्य (मतदार) आहेत.सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ६७ टक्के मतदान झाले होते.
या निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराजा पॅनेल, चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील निळकंठेश्वर पॅनेल रिंगणात आहे.
मतदानानंतर (DCM Ajit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,ही लोकशाही पद्धतीने चालणारी निवडणूक आहे. प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मतदारांना असल्याने तो ते पार पाडतील. कोण विकास करणार हे मतदार (Voter)ठरवतील. त्यांना अध्यक्षपदाच्या उमेदवारीबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की,मी अध्यक्षपदाचा उमेदवार आहे. मी ३५ वर्षे इथे काम करतो आहे. पीडीसीसी बँक रात्री उशिरापर्यंत चालू ठेवल्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी (MP Supriya Sule)सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्याबाबत विचारले असता, कोणी काहीही मागणी केली तर मी त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही,असे अजित पवार म्हणाले. तावरे गटाला टोला लगावत ते म्हणाले की,ज्या दिवशी आचारसंहिता सुरू झाली त्या दिवसापासून ते त्यांचा अड्डा शरद संकुल येथेच आहे. मला त्यात पडायचे नाही. (PDCC Bank) पीडीसीसी बँकेत निळकंठेश्वर पॅनलचा एक तरी सदस्य नव्हता. जे कोणी असतील त्यांना प्रश्न विचारा. आताही तेथे लोक बसलेले असतील. सहकाराच्या नियमात आचारसंहितेच्या काळात कोणालाही त्या ठिकाणी बसता येत नाही. तेथे बसून त्यांचा प्रचार करता येत नाही, याद्या करता येत नाहीत. काल रात्री सुद्धा तेथे बसून राजकारण सुरु होते. मला रात्री फोन आलेला, दादा तिथे स्कॉड पाठवा. परंतु मला काही करायचे नाही. ज्याचे त्याला लखलाभ होऊ द्या.