आटपाडीत परीक्षेत कमी गुण! वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू

Maharashtra man kills daughter over poor exam scores

Maharashtra man kills daughter over poor exam scores

सांगली – सांगली जिल्ह्यातील आटपाडीत बारावीच्या सराव परीक्षेत (poor exam score )कमी गुण मिळाल्याने वडिलांनी केलेल्या मारहाणीत (sangli) साधना धोंडीराम भोसले (१७) हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर वडील धोंडीराम भोसले यांना काल पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

साधनाची आई प्रीतीच्या तक्रारीनुसार, आटपाडीतील नेलकरंजी परिसरात बारावीच्या विज्ञान शाखेत शिकत असलेल्या साधनाला सराव परीक्षेत कमी गुण मिळाले. एका खासगी शिक्षण संस्थेत मुख्यध्यापक पदावर असलेल्या वडिलांना याबद्दल समजल्यावर त्यांचा संताप झाला. त्यांनी परीक्षेत कमी गुण कसे पडले? म्हणून त्यांनी जाब विचारला. डॉक्टर व्हायचे आहे, म्हणून आम्ही इतका खर्च करतो आहोत, असे त्यांनी मुलीला सांगितले. त्यानंतर बापलेकीत वाद झाला. त्यावेळी पप्पा, तुम्ही कुठे कलेक्टर झालात तुम्हालाही कमीच मार्क पडले होते ना? असे उलट उत्तर दिले. त्यानंतर वडिलांनी तिला जात्याच्या लाकडी खुंट्याने मारहाण केली. यामध्ये साधना गंभीर जखमी झाली. परंतु वडिलांनी तिला रुग्णालयात नेले नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी तिचे वडील योग दिन कार्यक्रमासाठी शाळेत निघून गेले. घरी आल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शनिवारी २१ जूनला रात्री साधनावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आई प्रीती भोसलेच्या तक्रारीवरून वडील धोंडीराम भोसले यांना अटक केली.