Poco F7 5G Smartphone | Poco कंपनीने बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Poco F7 5G नुकताच भारतातलाँच केला आहे. हा हँडसेट पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 चिपसेट, 6,000mm² व्हेपर कूलिंग चेंबर आणि शाओमीच्याHyperOS 2.0 सह येतो. Poco F7 5G च्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया.
किंमत आणि उपलब्धता
Poco F7 5G च्या भारतातील किंमत 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपयांपासून सुरू होते. तर, 12GB RAM + 512GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 33,999 रुपये आहे.
हा हँडसेट 1 जुलैपासून फ्लिपकार्टवर (Flipkart) खरेदीसाठी उपलब्ध होईल. हा फोन सायबर सिल्व्हर एडिशन, फ्रॉस्ट व्हाइटआणि फॅन्टम ब्लॅकया आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल.
स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स
डिस्प्ले: Poco F7 5G मध्ये 6.83-इंच 1.5K (1,280×2,772 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात 2,560Hz पर्यंत इन्स्टंटेनियस टच सॅम्पलिंग रेट, 3,840Hz PWM डिमिंग रेट आणि 3,200 निट्सपर्यंत ब्राइटनेस मिळते. यात HDR10+ सपोर्ट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन देखील आहे.
प्रोसेसर आणि स्टोरेज: यात स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 SoC असून, 12GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 512GB पर्यंत UFS4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे.
बॅटरी आणि कॅमेरा: Poco F7 5G मध्ये 50-मेगापिक्सलचा Sony IMX882 सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, सोबत 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड शूटर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
विशेष म्हणजे, Poco F7 5G च्या भारतीय व्हर्जनमध्ये तब्बल 7,550mAh ची प्रचंड बॅटरी देण्यात आली आयात 90W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 22.5W वायर्ड रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो.
सॉफ्टवेअर आणि अपडेट्स: Poco F7 5G अँड्रॉइड 15 आधारित HyperOS 2.0 सह येतो. याला चार वर्षांचे मोठे OS अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील.
AI फिचर्स: या फोनमध्ये Google Gemini आणि Circle to Search सह अनेक AI फिचर्सचा समावेश आहे. याशिवाय, AI नोट्स, AI इंटरप्रिटर, AI इमेज एन्हांसमेंट आणि AI इमेज एक्सपान्शन यासारखे टूल्स देखील उपलब्ध आहेत.
कूलिंग आणि गेमिंग: फोनमध्ये AI-बॅक्ड तापमान नियंत्रणासह 3D IceLoop सिस्टम आणि उष्णता कमी करण्यासाठी 6,000mm² व्हेपर कूलिंग चेंबर आहे. यात WildBoost Optimization 3.0 चा सपोर्ट आहे, जो गेमिंगचा अनुभव सुधारतो. तसेच, ड्युअल स्टीरिओ स्पीकर सिस्टम देखील आहे.