आयटीआयचे सुधारित वेळापत्रक जाहीर !

ITI new time table

पुणे – व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने औद्योगिक प्रशिक्षण (Directorate of Vocational Education and Training)संस्थांमध्ये ( ITI ) प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक (schedule)जाहीर केले आहे. यानुसार, यापूर्वी ३० जून रोजी प्रसिद्ध होणारी प्राथमिक गुणवत्ता यादी आता २८ जून रोजी तर ३ जुलै रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम गुणवत्ता यादी आता १ जुलै रोजी जाहीरकेली जाणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, प्रवेश प्रक्रिया (admissions) ७ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी नवीन वेळापत्रकानुसार तयारी करावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दहावीचा निकाल (10th)लागल्यानंतर अनेक विद्यार्थी अकरावी, पॉलिटेक्निक व आयटीआयकडे वळतात. मात्र, यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच आयटीआय प्रवेश प्रक्रियेचाही विलंब झाल्याने गोंधळ वाढला होता. त्यामुळे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने नियोजित वेळेपेक्षा लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.