पणजी – उत्तर गोवा (Goa) जिल्ह्यातील बार्देश तालुक्यातील पिर्ण गावातील रस्ता रुंदीकरणासाठी कोलवाळचे श्रीराम मंदिर (Shri Ram Temple) हटविण्याचा (demolish)प्रस्ताव आहे.मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली हे मंदिर पाडण्यास स्थानिक नागरिकांनी (Locals Oppose) जोरदार विरोध केला आहे.या मंदिराला हात लावला, तरी रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्ष (RGP) आणि स्थानिक नागरिक गप्प बसणार नाहीत, असा इशारा आरजीपीचे प्रमुख मनोज परब (Manoj Parab)यांनी दिला आहे.
मनोज परब म्हणाले की,नानोडा, मोपा, अडवलपाल अस्नोड्याला जोडणाऱ्या मुख्य जंक्शनवर असलेले रस्ते १५ ते २५ मीटर रुंद करण्याची सरकारची योजना आहे या योजनेतील रुंदीकरणामुळे या रस्त्यावरील घरे आणि दुकाने उद्ध्वस्त होणार आहेत. भाजपा प्रभू श्रीरामाच्या नावाने मते मागतो आणि सत्तेवर येतो. पण तेच सरकार रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली कोलवाळमधील पुरातन रामाचे मंदिर वाचवू शकत नाही. आम्ही ग्रामस्थ आणि आरजीपीचे कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत या राम मंदिराला हात लावू देणार नाही.