शक्तिपीठचे कोटी रुपये निवडणुकांवर खर्च होणार! राऊतांचा आरोप

Shaktipeeth's ₹10,000 Crore to be Spent on Elections, Alleges Sanjay Raut

Shaktipeeth’s ₹10,000 Crore to be Spent on Elections, Alleges Sanjay Raut


मुंबई – शक्तिपीठ महामार्ग(Shkatipeeth) हा जनतेच्या सोयीसाठी नव्हे तर (Eleaction)स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी काल सरकारने जे २० हजार कोटी रुपयांपैकी दहा हजार कोटी रुपये निवडणुका जिंकण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज केला.Alleges Sanjay Raut
भाजपाच्या काळात महाराष्ट्र (maharashtra)भ्रष्टाचाराच्या बाबतीत जगात अव्वल स्थानी पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणवल्या जाणाऱ्या(samruddhi) समृध्दी महामार्गाचा आमणे ते इगतपुरी हा शेवटचा टप्पा सुरू होऊन अवघे १९ दिवस झाले आहेत. एवढ्यातच या टप्प्यातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या भ्रष्टाचाराची जगातील कुठल्याही भ्रष्टाचाराशी तुलना होऊ शकणार नाही. शक्तिपीठ महामार्गासाठी घाईघाईने २० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील दहा हजार कोटी रुपये ठेकेदारांकडून काढून घेतले जातील. त्या पैशातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये माणसे विकत घेतली जातील. मते विकत घेतली जातील आणि पक्ष फोडले जातील,असे राऊत म्हणाले.