मुंबई – मुंबईतील पी.डीमेलो मार्गाला मोहंमद अली मार्ग, गिरगाव यांच्याशी जोडणाऱ्या कर्नाक पुलाचे (Karnak Bridge) बांधकाम अखेर पूर्ण झाला आहे. पुढील दोन दिवसांत हा पूल नागरिकांसाठी खुला करण्याचे नियोजन मुंबई पालिकेने केले आहे.
हा पूल १० जून रोजी लोकासाठी सुरु होणार होता. परंतु मार्गरेषा, पथदिवे,दिशादर्शक फलकांची कामे अपूर्ण असल्यामुळे हे उद्घाटन लांबणीवर गेले होते. हा पूल मुंबईकरांच्यासेवेत आल्यानंतर या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. कर्नाक पूल हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus), मशीद बंदर (Masjid Bandar) आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. हा १२५ वर्षे जुना पूल धोकादायक झाल्याने मध्य रेल्वेने ऑगस्ट २०२२ मध्ये पाडला होता. त्यानंतर पालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. मध्य रेल्वेने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार कर्नाक पुलाचे बांधकाम झाले आहे. या सर्व कामे पूर्ण झाली असून, पूल वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. येत्या दोन दिवसांत हा पूल सेवेत आणण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.