एअर इंडिया विमान अपघात ! ब्लॅक बॉक्स डेटा मिळाला

Air India Plane Crash! Black Box Data Recovered

Air India Plane Crash! Black Box Data Recovered

नवी दिल्ली – गुजरातच्या अहमदाबादमध्ये (Ahmadabad )१२ जून रोजी कोसळलेल्या (Air India)एअर इंडियाच्या ड्रिमलायनर विमानातील दोनपैकी(plane crash) एका ब्लॅक्सचा(black box) डेटा यशस्वी रित्या डाऊनलोड(data recovery) करण्यात आला आहे. या डेटाचे विश्लेषण करून अपघातापूर्वीचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यात येईल.भविष्यात असे अपघात होऊ नयेत म्हणून हवाई सुरक्षा वाढविण्यासाठी या माहितीचा उपयोग केला जाईल,असे केंद्रीय नागरी हवाई उड्डाण (Aviation)मंत्रालयाने आज सांगितले.
या अपघाताला १५ दिवस उलटून गेल्यानंतरही तपासाबद्दल विशेष तपशिल मंत्रालयाने अधिकृतपणे जाहीर न केल्याने तपासावरच शंका उपस्थित केली जात होती.या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.
विमान अपघात तपास महासंचलनालयाच्या पथकाने २४ जून रोजी अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या पथकाच्या सहकार्याने विमानाच्या पुढील भागात असलेल्या या ब्लॅकबॉक्समधील डेटा डाऊनलोड केला असून त्याचे विश्लेषण केले जात आहे,असे या निवेदनात म्हटले आहे. अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी १३ जून रोजी बहुस्तरीय तपास पथकाचे गठन करून वेगाने तपास सुरू करण्यात आला आहे,असा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.