मराठा आरक्षणासंबंधी याचिकेवर सुप्रिम कोर्टात जुलैमध्ये सुनावणी

Supreme Court to hear petition on Maratha reservation in July

Supreme Court to hear petition on Maratha reservation in July


नवी दिल्ली –
मराठा आरक्षणाच्या(maratha reservation) कायद्याच्या विरोधातील याचिकांवर अंतिम निकाल होईपर्यंत मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाचा लाभ घेण्यास परवानगी देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या (high court) निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर जुलै महिन्यात सुनावणी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ११ जून रोजी झालेल्या सुनावणीत आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार देताना याप्रकरणी अंतिम निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षणाचा लाभ देण्यास परवानगी दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.यापूर्वी याच मुद्दयावर दाखल याचिकांवरील सुनावणीमध्ये मराठा आरक्षणाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने (supreme court)आणि मुंबई उच्च न्यायालयानेही स्थगिती दिली होती. मात्र ११ जूनच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरत्या स्वरुपात मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ घेण्यास मंजुरी दिली. या याचिकेवर तातड़ीने सुनावणी होणे गरजेचे आहे, अशी विनंती याचिकाकर्त्याच्या वकिलाने केली. ती मान्य करून न्या. केव्ही विश्वनाथन आणि न्या. एन के सिंह यांच्या खंडपीठाने याचिकेवर १४ जुलैनंतर सुनावणी घेण्यास होकार दिला.