Surveillance on Zeeshan Siddiqui: Suspects Let Off After Interrogation
मुंबई – दिवंगत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करून पाळत ठेवणाऱ्या तरुणांना पोलिसांनी सोडून दिले.
काल रात्री उशिरा वांद्रे येथील खेरवाडी परिसरातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ दोन संशयित तरुणांना घेतले. दोघेही झिशान यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा संशय त्यांच्या कार्यकर्त्यांना आला. ते सकाळपासून सिद्दकींचा पाठलाग करत असल्याचे आढळले. त्यानुसार त्यांनी निर्मलनगर पोलीस ठाण्याला यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी याबाबत तपास सुरु करून रात्री दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही तरुण सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. त्यांना आर्थिक अडचण असल्यामुळे ते सिद्दिकी यांच्याकडे मदत मागण्यासाठी आले होते. झिशान सिद्दकींची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी ते त्यांच्या कार्यालयाबाहेर वाट पाहत उभे होते. तपासात त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सोडून दिले.
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री मुंबईतील वांद्रे पूर्व भागात बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली. १० जून रोजी बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा सूत्रधार झीशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवालला कॅनडामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.