मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार, कारण काय? जाणून घ्या

Mumbai Dabbawalas

Mumbai Dabbawalas | मुंबईची जगप्रसिद्ध डबेवाला सेवा (Mumbai Dabbawalas) एका दिवसासाठी बंद राहणार आहे. मुंबईकरांना येत्या 7 जुलै ला जेवणाचा डब्बा मिळणार नाही. मुंबई डबेवाला असोसिएशनने ही घोषणा केली असून, आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2025) वार्षिक पंढरपूर वारीत सहभागी होण्यासाठी शेकडो डबेवाले पंढरपूरला जाणार आहेत.

या दिवशी मुंबईतील डब्यांची डिलिव्हरी होणार नाही, त्यामुळे मुंबईकरांना पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आषाढी एकादशी आणि वारीचे महत्त्व

दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्यांसह पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचतात. हा आध्यात्मिक प्रवास भक्ती आणि समानतेचे प्रतीक आहे.

मुंबई डबेवाला असोसिएशनने सांगितले, “वारी ही आमच्यासाठी परंपरा आणि श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. आम्ही या आध्यात्मिक प्रवासाला प्राधान्य देतो, त्यामुळे 7 जुलै रोजी सेवा बंद राहील.”

जगभरात आपल्या वेळेवर आणि अचूक डबा डिलिव्हरीसाठी प्रसिद्ध असलेले डबेवाले दररोज हजारो मुंबईकरांना घरगुती जेवण पोहोचवतात. तरीही, त्यांनी धार्मिक परंपरेला प्राधान्य देत हा निर्णय घेतला आहे. “हा प्रवास आम्हाला आमच्या मूळ आणि श्रद्धेशी जोडतो,” असे असोसिएशनने म्हटले. आषाढी एकादिशी निमित्ताने 7 जुलै रोजी डबे पोहोचवण्याची सेवा बंद ठेवली जाणार आहे. 8 जुलैपासून सेवा नेहमीप्रमाणे सुरू होईल.