Apache RTR 160 2025 | टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) आपली लोकप्रिय 160 सीसी मोटरसायकल 2025 Apache RTR 160 भारतात अधिकृतपणे लॉन्च केली आहे. कंपनीने लोकप्रिय Apache RTR 160 चे नवीन मॉडेल लाँच केले आहे.
कंपनीने 1,34,320 रुपये किमतीत ही बाईक लाँच केले आहे. कंपनीने बाईकच्या सुरक्षा, तंत्रज्ञान आणि डिझाइनमध्ये मोठे बदल केले आहेत.
सुरक्षा आणि तंत्रज्ञान
सुरक्षेच्या बाबतीत, 2025 Apache RTR 160 मध्ये प्रथमच ‘डुअल-चॅनेल एबीएस’ (Dual-channel ABS) देण्यात आले आहे, जे एक अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा फिचर आहे. यामुळे अचानक ब्रेक लावताना बाईकवर उत्तम नियंत्रण मिळवता येते. यासोबतच, ही बाईक आता नवीन उत्सर्जन नियमांनुसार OBD2B-कंप्लायंटइंजिनसह येते, जे रिअल-टाईम डायग्नोस्टिक्सला सपोर्ट करते.
इंजिन आणि परफॉर्मन्स
2025 च्या मॉडेलमध्ये 159.7 सीसीचे जुनेच दमदार इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. हे इंजिन 8,750 RPM वर 15.81 bhp पॉवर आणि 7,000 RPM वर 13.85 Nm टॉर्क जनरेट करते.
इतर फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Apache RTR 160 मध्ये तीन रायडिंग मोड्स (riding modes) मिळतात: स्पोर्ट (Sport), अर्बन (Urban) आणि रेन (Rain). प्रत्येक मोडमध्ये थ्रॉटल रिस्पॉन्स आणि एबीएसचे वर्तन वेगवेगळ्या रायडिंग परिस्थितीनुसार बदलता येते. टीव्हीएसचे SmartXonnect सिस्टीमही यात कायम ठेवण्यात आले आहे, जे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी द्वारे टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल अलर्ट आणि व्हॉईस असिस्टसारख्या सुविधा पुरवते.