बूंद से गई वो हौद से नहीं आती खा.राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Jo Bund se gayi haud se nahi aati MP Rane slams Uddhav Thackeray

Jo Bund se gayi haud se nahi aati MP Rane slams Uddhav Thackeray

मुंबई – जो बूंद से गई वो हौद से नहीं आती असा टोला (BJP MP)भाजपा खासदार नारायण राणे यांनी(UBT) उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक्सवरून(Slam on X Post) लगावला आहे.त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, उद्धव ठाकरे मनसे(MNS) प्रमुख राज ठाकरे यांना भाऊबंदकी (thackeray brother’s)या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटते ? आता का म्हणून लाळ ओकत आहेत.
राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, (DCM Shinde)एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे(Balasaheb thackeray) यांनी शिवसेनेला(shivsena) सत्तेत बसवले यांनी सत्ता घालवली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी त्यांना घरी बसवले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती !