ठाणे-बोरिवली रस्ता कंत्राटावरून विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन

opposition protest -On the third day of the monsoon session

मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (monsoon session)तिसऱ्या दिवशी ठाणे ते बोरिवली रस्त्याच्या कंत्राटावरून विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार आंदोलन(protest) केले. विधान भवनाच्या (Vidhan Bhavan)पायऱ्यांवर सरकारचा लाडका कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंग असे बॅनर हातात घेत काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारवर टीका (criticized)केली.


ठाणे ते बोरिवली (Thane–Borivali road) या रस्त्याचे कंत्राट मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला देण्यात आले असून या व्यवहारात तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला . सुप्रीम कोर्टाने या कंपनीवर यापूर्वीच कडक शब्दांत ताशेरे ओढले असतानाही सरकारने मेघा कंपनीवर (Megha Engineering)मेहेरबानी केल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनादरम्यान मेघा इंजिनिअरिंग तुपाशी, शेतकरी उपाशी आणि मेघा इंजिनिअरिंगचे लाभार्थी शिंदे-फडणवीस अशा घोषणा देण्यात आल्या. विरोधकांनी या प्रकरणावर सरकारने तत्काळ स्पष्टीकरण द्यावे. संबधित टेंडरही रद्द करावे, अशी मागणी केली.