उबाठा पक्षचिन्ह व नावावर २ वर्षांनंतर १६ जुलैला सुनावणी

UBT hearing on party symbol & name scheduled on July 16 after 2 years

UBT hearing on party symbol & name scheduled on July 16 after 2 years

नवी दिल्ली – शिवसेना उबाठा (UBT)गटाची पक्षचिन्ह व नावाबाबत १६ जुलैला(SC) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीला सुमारे दोन वर्षांनी या मुहूर्त सापडला आहे. (party name symbol hearing)

शिवसेना उबाठा पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आज याप्रकरणी हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने एवढे तातडीचे काय आहे, अशी विचारणा केली. तेव्हा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी सांगितले की, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Eleaction) निवडणुका आहेत. उमेदवारांना चिन्ह निवडण्याचा अधिकार असतो. याबाबतीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एक आदेश दिला आहे. न्यायालयाने(NCP) अजित पवार यांच्या पक्षाला प्रत्येक ठिकाणी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे लिहिण्याचे निर्देश आहेत. त्या स्वरूपाचा दिलासा ठाकरे गटालाही अपेक्षित आहे. यावर शिंदे गटाच्या वकिलांनी या मागणीला विरोध करत नमूद केले की, न्यायालयाने यापूर्वीच ही मागणी फेटाळली आहे. त्यामुळे तातडीच्या सुनावणीची आवश्यकता नाही. मात्र, न्यायालयाने तातडीच्या सुनावणीची आवश्यकता नाही तरी १६ जुलैला हे प्रकरण सूचीवर ठेवून त्यावर सुनावणी होईल, असे सांगितले.