Tax on Car in India | भारतात घर, कार खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. घर, कारच्या वाढत्या किंमतीसोबतच त्यावर द्यावा लागणार प्रचंड कर देखील हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे. यासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर होत असून, याद्वारे वाढते कर, आर्थिक विषमता आणि मध्यमवर्गाच्या कोंडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भारतात 13 लाखांच्या कारसाठी 22 लाख रुपये मोजावे लागतात. कारच्या किंमतीच्या 74 टक्के कर भरावा लागत असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. वाहनांवरील जीएसटी, रोड टॅक्स आणि घरांवरील कर्ज व्याजामुळे मध्यमवर्ग त्रस्त आहे. अनेकांनी या पोस्टवर कर प्रणालीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
एक्सवर (ट्विटर) एका यूजरने आपल्या कार खरेदीची माहिती शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की “13.02 लाखांच्या कारसाठी 5.86 लाख जीएसटी आणि 3.78 लाख रोड टॅक्स भरावा लागला. म्हणजे एकूण 9.64 लाख कर, म्हणजेच कारच्या किमतीच्या 74%!” त्याने पुढे लिहिले, “यामुळेच भारतात बहुतेकांना कार परवडत नाही.”
I bought a new car.
— Niraj Dugar (@contliving) May 21, 2025
Cost of car – 13.02 lakhs
GST on car – 5.86 lakhs
Road tax – 3.78 lakhs
Total tax – 9.64 lakhs
74% tax on the cost of car.
No wonder most of can’t afford cars in India.
या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे. एका यूजरने संताप व्यक्त करत म्हटले की, “22 लाख देण्यासाठी 30 लाख कमवावे लागतात. पगारदार वर्गाने कार, फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी करू नये. ही व्यवस्था सडली आहे, ती नष्ट करा!”
वाहनांवरील एकरकमी कर, घरांसाठी कर्ज आणि वाढते खर्च यामुळे मध्यमवर्गाची स्वप्ने आर्थिक सापळ्यात अडकत आहेत. “80% गृहकर्ज आणि 8% वैयक्तिक कर्ज फक्त रजिस्ट्रेशन टॅक्स भरण्यासाठी घ्यावे लागते,” असे या पोस्टमध्ये नमूद आहे. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी आणि जीएसटीमुळे प्रत्येक टप्प्यावर खर्च वाढत आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत असून, अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत.