फॉक्सकॉनने भारतातील चिनी तंत्रज्ञांना मायदेशी परतण्यास सांगितले


नवी दिल्ली- अ‍ॅपलच्या आयफोनची निर्मिती करणाऱ्या तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीने भारतातील आपल्या काऱखान्यामधील ३०० चिनी अभियंते आणि तंत्रज्ञांना चीनमध्ये परतण्यास सांगितले आहे. फॉक्सकॉनच्या निर्णयामुळे अ‍ॅपल कंपनीच्या भारतात आयफोनचे उत्पादन वाढवण्याच्या योजनेला फटका बसणार आहे. काही दिवसांपूर्वी अ‍ॅपलने भारतात कंपनीचा विस्तार करण्याची योजना जाहीर केली. त्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोध करून कंपनी आपल्या निर्णयावर ठाम आहे. परंतु आता फॉक्सकॉनने भारतातील आयफोन निर्मिती प्रकल्पातून चिनी अभियंत्यांना पुन्हा चीनला जाण्यास सांगितल्याने अ‍ॅपलची भारतात उत्पादनवाढीची योजना बारगळणार आहे. ब्ल्युमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या दोन महिन्यापासून फॉक्सकॉन टप्प्याटप्प्याने चिनी अभियंत्यांना भारतातून पुन्हा चीनमध्ये पाठवत आहे. मात्र याचे नेमके कारण कंपनीने स्पष्ट केलेले नाही.