सॅनिटरी पॅडच्या पाकिटावरील राहुल गांधीच्या फोटोमुळे वाद

Rahul Gandhi’s photo on sanitary pad


पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचार (Election campaigning) सुरू झाला असून काँग्रेसने बिहारमध्ये ५ लाख सॅनिटरी पॅडची (sanitary pad)पाकिटे वाटप करायला सुरुवात केली आहे. मात्र, या सॅनिटरी नॅपकिनच्या पाकिटावर राहुल गांधी यांचा फोटो छापल्याने वाद निर्माण झाला आहे. या फोटोवरुन भाजपाने काँग्रेसवर कठोर टीका केली असून काँग्रसची (Congress)ही बौद्धिक दिवाळखोरी असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसकडून वाटल्या जाणार्या सॅनिटरी पाकिटावर राहुल गांधीबरोबर प्रियांका गांधींचाही फोटो आहे. त्याचबरोबर महिलांना देण्यात येणाऱ्या २५ हजार रुपयांच्या माई बहन माँ योजनेची माहितीही छापण्यात आली आहे. या पाकिटांमुळे सध्या काँग्रेस-भाजपात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजपाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारे पाकिटांवर राहुल गांधींचा (Rahul gandhi)फोटो छापणे हा बिहारमधील महिलांचा अपमान आहे. महिला काँग्रेस प्रमुख अलका लांबा यांनी म्हटले आहे की, बिहार सरकार राज्यातील ४०,००० शाळांमध्ये सॅनिटरी नॅपिकिन्स पुरवल्याचा दावा करत असले तरी केवळ ३५० शाळांमध्येच हे नॅपकिन पुरवल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. बिहार सरकार केवळ २० टक्के शाळकरी मुलींनाच सॅनिटरी नॅपकीन पुरवत असून राज्यातील ८० टक्के मुली यापासून वंचित आहेत. त्यांना काँग्रेसकडून सॅनिटरी नॅपकिन वाटण्यात येणार आहेत.